शीर्षक कोविड-१९ समवेत, उद्भवणाऱ्या श्वसन-संबंधित विषाणू: निदान, प्रतिबंध, प्रतिसाद आणि नियमनाच्या पद्धती
Offered By: OpenWHO
Course Description
Overview
सार: कोरोनाविषाणू हा विषाणूंचा एक मोठा गट आहे. त्यांच्यामुळे साध्या सर्दी-पडशापासून ते मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) आणि सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) अशा अधिक गंभीर स्वरूपाचे अनेक आजार होऊ शकतात.
२०१९ साली चीनमधील वुहान प्रांतामध्ये एक नवीन प्रकारचा कोरोना विषाणू (कोविड-१९) सापडला गेला. हा नवीन प्रकारचा विषाणू याआधी कधीही माणसांमध्ये आढळला नव्हता.
हा कोर्स कोविड-१९ आणि श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या इतर विषाणूंविषयी सर्वसाधारण माहिती पुरवतो आणि याचा हेतू सार्वजनिक आरोग्य संबंधित व्यावसायिक, घटना व्यवस्थापक आणि संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संघटना आणि एनजीओ संघटना यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देणे असा आहे.
या आजाराचे अधिकृत नाव काही संशोधन केल्यानंतर ठरवले गेले असल्याने कुठेही nCoV असा उल्लेख आढळल्यास त्याचा अर्थ कोविड-१९, म्हणजे अलीकडेच शोध लागलेल्या कोरोनाविषाणूंमुळे होणारा संसर्गजन्य आजार असे समजावे.
कृपया लक्षात घ्या की या कोर्सची सामग्री सध्या सर्वात अलीकडील मार्गदर्शन प्रतिबिंबित करण्यासाठी सुधारित केली जात आहे. खालील कोर्सेसमध्ये तुम्हाला विशिष्ट COVID-19-संबंधित विषयांवर अपडेट केलेली माहिती मिळू शकते:
लसीकरण: COVID-19 लस चॅनल
IPC उपाय: IPC साठी COVID-19
प्रतिजन जलद निदान चाचणी: 1) SARS-CoV-2 प्रतिजन जलद निदान चाचणी; 2) SARS-CoV-2 प्रतिजन आरडीटी अंमलबजावणीसाठी मुख्य विचार
Syllabus
Course information
हा कोर्स पुढे नमूद केलेल्या इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे:
English - français - Español - 中文 - Português - العربية - русский - Türkçe - српски језик - فارسی - हिन्दी, हिंदी - македонски јазик - Tiếng Việt - Indian sign language - magyar - Bahasa Indonesia - বাংলা - اردو - Kiswahili - አማርኛ - ଓଡିଆ - Hausa - Tetun - Deutsch - Èdè Yorùbá - Asụsụ Igbo - ਪੰਜਾਬੀ - isiZulu - Soomaaliga- Afaan Oromoo - دری - Kurdî - پښتو - Fulfulde- සිංහල - Latviešu valoda - తెలుగు -Esperanto- ภาษาไทย - chiShona - Kreyòl ayisyen -Казақ тілі - தமிழ் - Ελληνικά
आढावा: हा कोर्स नवीन कोरोनाविषाणूं समवेत श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या इतर विषाणूंविषयी सर्वसाधारण माहीती देतो. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही पुढील मुद्द्यांविषयी माहिती देऊ शकाल:
- श्वसन संबंधात उद्भवणारे नवीन विषाणू कशा प्रकारचे असतात, साथीची लागण कशी शोधावी व तिचा आढावा कसा घ्यावा, नवीन उद्भवणाऱ्या श्वसन संबंधित विषाणूंमुळे होणाऱ्या साथीच्या प्रसाराचा प्रतिबंध व नियमन करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा.
- श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या नवीन विषाणूंमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी माहितीची समाजामध्ये देवाणघेवाण करण्यासाठी आणि समाजातील वेगवेगळ्या समुदायांना या साथीच्या संसर्गाचा शोध, प्रतिबंध आणि प्रतिसाद यामध्ये सामील करून घेण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा.
प्रत्येक घटकाशी संलग्न असलेल्या स्रोतांचा उपयोग करून तुम्हाला त्या विषयाबद्दल अधिक सविस्तर माहिती मिळवता येईल.
शिक्षणाचा उद्देश: श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या विषाणूंविषयीची मूलभूत तत्वे आणि त्याच्या साथीच्या प्रसाराला परिणामकारक प्रतिसाद कसा देता येईल ते सांगा. कोर्स पूर्ण करण्यासाठी
लागणारा वेळ: अंदाजे 3 तास
प्रमाणपत्रे: सर्व चाचण्यांमध्ये कमीत कमी ८०% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांसाठी यशस्वी कामगिरीचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल. ज्यांना रेकॉर्ड ऑफ अचीव्हमेंट प्राप्त होते ते या कोर्ससाठी ओपन बॅज देखील डाउनलोड करू शकतात. कसे ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
कोविड-१९ समवेत सर्व उद्भवणारे श्वसन-संबंधित विषाणू: आजाराचे निदान करण्याच्या पद्धती, प्रतिबंध, प्रतिसाद आणि नियमन २०२० Emerging respiratory viruses, including COVID-19: methods for detection, prevention, response and control, 2020 मधून मराठीमध्ये अनुवादित . या अनुवादाच्या सामग्री किंवा अचूकता यासाठी WHO जबाबदार नाही. इंग्रजी आणि मराठी भाषांतरात काही विसंगती आढळल्यास मूळ इंग्रजी आवृत्ती बंधनकारक आणि अस्सल आवृत्ती असेल.
हा अनुवाद WHO द्वारे तपासला गेलेला नाही. या माहिती स्रोताचा उद्देश केवळ शिक्षणाला मदत एवढाच आहे.
Course contents
मॉड्युल १: कोविड-१९ समवेत श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या विषाणूंविषयी प्रस्तावना :
सर्वसाधारण शिक्षणाचा उद्देश: कोविड-19 समवेत श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या विषाणूंमुळे जागतिक पातळीवर लोकांच्या आरोग्याला कसा धोका पोहोचतो याविषयी स्पष्टीकरण देता येणेमॉड्युल २: कोविड-१९ समवेत श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या विषाणूंची तपासणी: पाळत आणि प्रयोगशाळेतील तपासणी:
पाळत आणि प्रयोगशाळेतील तपासणी: सर्वसाधारण शिक्षणाचा उद्देश: श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या विषाणूंमुळे होणाऱ्या साथीची लागण कशाप्रकारे शोधून काढावी व तिचा आढावा कसा घ्यावा या विषयी माहीती देता येणे.मॉड्युल ३: प्रयोगशाळेतील तपास:
या युनिटच्या शेवटी, सहभागी पुढील गोष्टींचे वर्णन करण्यास सक्षम असतील: कोणत्या प्रकारचे नमुने आवश्यक आहेत, प्रयोगशाळेत निदान निश्चित करण्यासाठी कोणत्या प्रकारची तपासणी आवश्यक आहेमॉड्युल ४: जोखीम संवाद आणि सामाजिक सहभाग:
सर्वसाधारण शिक्षणाचा उद्देश: जोखिमीविषयी संवाद साधत आणि समाजातील समुदायांना सहभागी करत कोविड-१९ चा शोध, प्रतिबंध करणे आणि त्याला प्रतिसाद देणे यासाठी कोणत्या धोरणांचा अवलंब करावा याबद्दल माहीती देता येणेमॉड्युल ५: सामाजिक सहभाग:
या युनिटच्या शेवटी, सहभागी पुढील गोष्टींमध्ये सक्षम होतील: साथीच्या उद्रेका दरम्यान प्रतिसादकर्त्यांनी समुदायांना गुंतवून घेण्याची आवश्यकता का आहे ह्याची किमान तीन कारणे सांगणे, सामुदायिक प्रतिबद्धतेमध्ये येणाऱ्या अडचणींची यादी तयार करा आणि, साथीच्या उद्रेकामध्ये सामुदायिक प्रतिबद्धतेचा प्रभावीरित्या उपयोग करून संसर्गाचा शोध, नियमन आणि प्रतिसाद यासाठी कोणत्या पद्धती वापरणे योग्य आहे याचे वर्णन करामॉड्युल ६: कोविड -१९ श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या विषाणूंचा प्रतिबंध आणि त्यांना प्रतिसाद:
सर्वसाधारण शिक्षणाचा उद्देश: कोरोना विषाणूंच्या उद्रेकासमवेत इतर श्वसन संबंधात उद्भवणाऱ्या रोगजंतूंचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्याच्या धोरणांविषयी माहिती देणे
Related Courses
Nutrition for Health Promotion and Disease PreventionUniversity of California, San Francisco via Coursera The New Nordic Diet - from Gastronomy to Health
University of Copenhagen via Coursera Epidemics - the Dynamics of Infectious Diseases
Pennsylvania State University via Coursera Sustainable Food Production Through Livestock Health Management
University of Illinois at Urbana-Champaign via Coursera Myths and Realities of Personalised Medicine: The Genetic Revolution
University of New South Wales via Coursera